मी केलेला प्रवास मराठी निबंध | Essay on my train journey in Marathi

My journey essay in marathi: प्रत्येक व्यक्ति आपल्या आयुष्यात कधी न कधी प्रवास नक्कीच करतो. परंतु काही प्रवास हे कायम स्मरणात राहतात. आजच्या या लेखात आपण मी केलेला रेल्वे प्रवास निबंध पाहणार आहोत. 


Essay on my journey in Marathi

मी केलेला प्रवास मराठी निबंध | Essay on my train journey in Marathi

प्रवासाचा एक वेगळाच सुखद अनुभव असतो. प्रवास हा मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रत्येक प्रवासात काही न काही आठवणी तयार होतात. परंतु काही प्रवास असे असतात कि जे आयुष्यभर अविस्मरणीय राहतात. प्रवासाने दैनंदिन कामाचा सर्व थकवा व चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की सुंदर निसर्गातील प्रवास आपले आरोग्य आणि बुद्धीला चालना देतो.


मागील वर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये आम्ही देखील दैनंदिन कामाला ब्रेक लाऊन गोवा फिरायला जाण्याचा ठरवले. गोवा जाण्याचा हा निर्णय माझ्या वडिलांनी घेतला होता. गोव्याचा हा प्रवास अतिशय रोमांचक, साहसिक आणि मनोरंजक होता. 


आमच्या गोवा प्रवासाची सुरुवात रेल्वेने झाली. रेल्वेचा प्रवास माझ्यासाठी नेहमी मनोरंजक ठरला आहे. लहानपणापासूनच मी रेल्वेची यात्रा करीत आहे. माझे नाना हे औरंगाबाद जवळ राहतात आणि आम्ही पुण्यात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये दरवर्षी रेल्वेने प्रवास करीत मी माझ्या नानाच्या गावी जायचो. या वर्षी देखील रेल्वेचा प्रवास करण्याची संधी मिळाली होती, परंतु ती नानाच्या गावाला नव्हे तर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गोव्याला जाण्यासाठी..!


गोव्याचा हा रेल्वे प्रवासातील क्षण माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होते. या प्रवासात माझ्या सोबत आई वडील, माझा भाऊ व मोठी बहीण होते. रेल्वे मध्ये प्रवेश करता बरोबर मी खिडकी कडील सीट सांभाळले. आणि हळू हळू करत रेल्वे सुरू झाली. आता रेल्वे ने गती धरली होती. माझ्या आईने आमच्या साठी स्वादिष्ट बिर्याणी बनवली होती. काही वेळानंतर आम्ही सर्वांनी मिळून बिर्याणी खाल्ली. 


रात्रीची वेळ असल्याने बाहेरचे दृश्य काही खास दिसत नव्हते. म्हणून आम्ही पत्ते खेळण्याचा निर्णय घेतला. माझी दीदी भाऊ आणि मी सर्वात वरच्या बर्थ वर जाऊन बसलो. तेथे आम्ही आपला पत्यांचा खेळ सुरू केला. 4-5 पत्यांचे डाव खेळल्यानंतर आम्ही अंताक्षरी खेळायचे ठरवले. एक एक जण गाणी म्हणू लागलो. आमच्या रेल्वे डब्ब्यात आमच्या शिवाय कोणीही नव्हते. टीसी च्या म्हणण्यानुसार ज्या कुटुंबाने आमच्या डब्ब्यात सीट बुक केली होती त्यांनी आपली बुकिंग ऐनवेळी कॅन्सल केली. डब्यात आम्हीच असल्याने कोणीही रोकटोक करणारे नव्हते. 


पत्ते आणि अंताक्षरी चा खेळ झाल्यानंतर आम्हाला भूक लागायला लागली. नाश्ता म्हणून आम्ही बागेतून चिप्स व बिस्कीट चे पॅकेट काढले. मस्त पैकी स्वाद घेत चुटकुले ऐकत आम्ही प्रवास करू लागले. आता रात्रीचे 1 वाजले होते. म्हणून आम्ही झोपण्याचा निर्णय घेतला. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा 5 वाजले होते, बाहेर हल्का प्रकाश पडला होता पण अजून सूर्य उगवला नव्हता. मी खिडकी जवळची जागा सांभाळली व बाहेर पाहू लागलो. 


हिरवे हिरवे शेत, सुंदर दिसणारे लहान मोठे पर्वत आणि लांब लांब रस्ते मला रोमांचित करीत होते. इतके सुंदर निसर्ग सौंदर्य मी आजवर पाहिले नव्हते. आता गोवा जवळ आले होते. गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य माझ्या मनाला मोहित करीत होते. ते नयनरम्य सौंदर्य डोळ्यात साठवता येत नव्हते. मी माझा मोबाईल काढला व एक एक दृष्याची फोटो टिपू लागलो. जवळपास चौदा तासांच्या प्रवासानंतर आम्ही गोवा पोहचलो. ज्या ठिकाणी पोहचण्यासाठी प्रवास इतका सुंदर होता ते ठिकाण अर्थात गोवा त्या पेक्षाही सुंदर होते. माझ्या वडिलांनी गोव्यातील प्रसिद्ध हॉटेल मध्ये रूम बुक केला होता. गोव्याचा सुंदर समुद्र किनारा सर्व चिंता, दुःख आणि तणाव दूर करतो.  


आम्ही गोव्याला 6 दिवस राहिलो. यानंतर पुन्हा त्याच रस्त्याने प्रवास करीत पुण्याला आलो. अश्या पद्धतीने गोव्याची ही प्रवास यात्रा माझ्या जीवनातील अविस्मरणीय रेल्वे प्रवास होता.


तर मित्रहो हा होता mi kelela pravas marathi nibandh आशा करतो की हा Essay on my train journey in Marathi तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला असेल. धन्यवाद.. 


READ MORE:

माझी सहल निबंध

पावसाळ्यातील एक दिवस निबंध 

माझे बालपण निबंध

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने