क्रीडांगणाचे मनोगत / आत्मकथा मराठी निबंध | Autobiography of playground in Marathi

kridangana che manogat: प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्य कधी न कधी तर क्रीडांगण पहीलेलेच असते. व प्रत्येकजण त्यावर खेळलेला देखील असतो. आजच्या या लेखात असेच एक शाळेचे क्रीडांगण आपली आत्मकथा सांगत आहे. तर चला सुरू करुया..



 क्रीडांगणाचे मनोगत | Kridangana Che Manogat Marathi (450 शब्द)

मी आकाराने खूप मोठा आणि विशाल आहे. दिवसभरात माझ्यावर अनेक लोकांचे येणे जाणे आणि लहान मुलांचे खेळणे सुरू असते. मी एका शाळेचे क्रीडांगण बोलत आहे. माझ्या एका बाजूला शाळेची 4 मजली विशाल इमारत उभी आहे. याशिवाय चारही बाजूंना तारेचे कुंपण बनवून शाळेत ये जा करण्यासाठी एक मोठे गेट ठेवले आहे. माझ्या आजूबाजूला अनेक झाडे लावण्यात आली आहेत, ज्यांच्या सावलीत अनेक लोक येऊन बसतात. 


माझ्यावर आणखी एक कुंपण करून तेथे सुंदर बाग बनवण्यात आली आहे. या बागेत मऊ गवत व एक लहानसे पाण्याचे कुंड बनवण्यात आले आहे. बागेतील शांत तलाव, सुंदर झाडे आणि रंगीबिरंगी फुले यांच्या सौंदर्यात भर करणारे गोंडस सश्याची पिल्ले या बागेत इकडून तिकडे पळत असतात. याशिवाय अनेक वेगवेगळे पक्षी बागेतील झाडांवर बसून सुंदर गाणे गात असतात. त्यांचे सौंदर्य पाहणारा आपले भान हरपून पाहताच राहतो. या बागेत येणाऱ्यांना वेळेचे भान राहत नाही.


याशिवाय माझ्यावर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी वेगवेगळे खेळांचे साहित्य लावण्यात आले आहे. माझ्या उजव्या बाजूला एक बास्केटबॉल खेळण्यासाठी गोल जाळी लावली आहे. तेथील माझा भाग सिमेंट ने पक्का करण्यात आला आहे. ह्यालाच बास्केटबॉल चे मैदान नाव दिले आहे. यानंतर त्याच्याच बाजूला एक मजबूत खांब रोवला आहे. या खांबावर मल्लखांब चे शिक्षक विद्यार्थ्यांना मल्लखांब शिकवतात. माझ्या मधोमध एक जाळी लावण्यात आली आहे, ही जाळी हॉलीबॉल व बॅडमिंटन खेळणार्यांसाठी आहे. या जाळीच्या दोघी बाजूंना खेळाडू उभे राहून चेंडू अथवा शटल कॉक एकडून तिकडे पाठवतात. याशिवाय कब्बडी, खोखो, क्रिकेट असे सर्वच खेळ खेळण्यासाठी माझ्यावर व्यवस्था करण्यात आली आहे.


दुपारच्या वेळी जेव्हा शाळेच्या जेवणाची सुट्टी होते. तेव्हा सर्व विद्यार्थी माझ्यावर येऊन बसतात, ते आपापले डबे खातात. उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या चारही बाजूंना असणाऱ्या झाडांच्या शीतल छायेत ते आनंदाने डबे खातात. याशिवाय थंडीच्या दिवसात तर सर्व विद्यार्थी माझ्या मधोमध अंगावर उन्ह घेत बसतात. संध्याकाळच्या वेळी बहुतेक विद्यार्थ्यांचे पी. टी. चे तास असतात. म्हणून त्या वेळी मी कसा गजबजलेला दिसतो. माझ्या चारही बाजूंना विद्यार्थी वेगवेगळे खेळ खेळत असतात. जेव्हा माझ्यावर खेळ खेळले जाते तेव्हा मला खूप आवडते. शेवटी क्रिडांगणावर इतरांना आनंदाने खेळावे यातच त्याचा आनंद असतो. 


परंतु मागील काही काळात आलेल्या बदलांमुळे मी अतिशय उदास आणि एकटा पडलो आहे. मागील वर्षी देशभरात.., देशभरात नव्हे तर जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस मुळे सर्व शाळा आणि क्रीडांगणे बंद करण्यात आली. मला खूप एकटे एकटे वाटू लागले. कशे तरी मी दिवस लोटू लागलो. सकाळ संध्याकाळ लहान मुले, तरुण आणि वृद्धांच्या आवाजाने गुंजनारे मैदान अतिशय शांत झाले होते. त्या स्मशान शांततेत दिवस काढणे खूप कठीण होते. पण शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता. 


2-4 महिन्यानंतर हळू हळू शाळेजवळ असणारे लोक व लहान मुले माझ्यावर फिरायला येऊ लागले. माझा जीवात जीव आला. परंतु आधी सारखा किलबिलाट आणि मुलांची गलबल अजुनही सुरू झाली नव्हती. नंतरच्या काळात शाळा सुरू झाल्या पण विद्यार्थी खूप कमी येऊ लागले. मी दिवसरात्र परमेश्वराला प्रार्थना करीत असतो की लवकरात लवकर जगावर आलेली ही महामारी दूर करून पूर्वीसारखे जग सुरू कर. सर्वांना निरोगी करून मला पूर्वीसारखेच संपूर्ण कर.

**समाप्त**


तर मित्रहो हे होते 'क्रीडांगणाचे मनोगत मराठी निबंध. 

आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल. असेच इतर विषयांवरील निबंध आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.. 

READ MORE:

 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने