मी झाड झालो तर निबंध मराठी | if i become a tree essay in marathi | mi zad zalo tar

मी झाड झाले तर निबंध | mi zad zalo tar marathi nibandh

if i become a tree essay in marathi : मित्रांनो निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. या अनमोल गोष्टींपैकी एक आहे झाड. पृथ्वीवर असलेले सजीव जीवन झाडांमुळेच संभव आहे. आजच्या या लेखात मी झाड झाले तर हा मराठी निबंध देण्यात आला आहे. mi zad zalo tar माझे विचार आणि प्रतिक्रिया कशी राहील याबद्दल पुढे लिहिण्यात आले आहे. तर चला सुरू करुया...


mi zad zalo tar marathi nibandh

मी झाड झालो तर निबंध मराठी | if i become a tree essay in marathi

(350 शब्द)

मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन देण्यासाठी झाडेझुडपे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑक्सीजन शिवाय जीवन अशक्य आहे. झाडे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड आपल्या आत खेचून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन संपूर्ण मानव जातीला देतात. झाडे ही फक्त मनुष्यासाठीच नव्हे तर प्राणी, पक्षी आणि पृथ्वीवर असणाऱ्या लहानात लहान जीवजंतू साठी महत्वपूर्ण आहे. कडकडत्या उन्हाळ्यात जेव्हा चारही बाजूंना पृथ्वी तप्त असते तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना थंडगार हवा आणि शीतल छाया वृक्ष प्रदान करतात. 


मनुष्य जातीवर झाडांचे फार उपकार आहेत. जर मी झाड राहिलो असतो तर मला याचा खूप अभिमान झाला असता आणि दुसर्याच्या कामी येण्याचे सौभाग्य ते मला प्राप्त झाले असते. माझ्या लाकडाच्या उपयोगाने लोकांनी आपल्या घराचे फर्निचर बनवले असते. माझ्या लाकडाचा उपयोग करून स्त्रियांनी अन्न शिजवले असते. मी किती उपयोगी येतोय हे पाहून मला खूप आनंद झाला असता.


जर मी झाड झालो तर हे पाहून खूप आनंदी होईल की रंगीबेरंगी सुंदर पक्षी माझ्यावर आपले घरटे बनवित आहेत. पक्ष्यांची लहान लहान पिल्ले माझ्यावर सुखरूप राहिली असती. माझ्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर बसून त्यांनी उडणे शिकले असते. मी पक्षी, प्राणी आणि मनुष्याला गोड गोड फळे दिली असती. माझ्यावर फुलणाऱ्या सुंदर फुलांनी तुमच्या बागेची शोभा वाढवली असती. याशिवाय आज आपली पृथ्वी अनेक संकटे, प्रदूषण, महामारी इत्यादींनी त्रस्त झालेली आहे. शास्त्रज्ञांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी ची जागृती निर्माण करण्यासाठी कार्य सुरू केले आहे. मी झाड झालो तर पूर्ण शक्तीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य करेल. 


मी झाड आलो तर मला मनुष्याच्या कामी येण्याचा अत्यंत आनंद होईल परंतु दुसरीकडे या गोष्टीचे भय देखील राहील की एखाद्या दिवशी आपल्या स्वार्थासाठी मनुष्य मला तोडून तर नाही टाकणार? कारण आज आपल्या देशात आधुनिकीकरण व लोकसंख्या वाढ इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई सुरू आहे. मी झाड झालो तर माझी एकच प्रार्थना राहील की मनुष्याने मला कापायला नको. त्याला आवश्यक असणारे लाकूड तो माझ्या वरून तोडून घेऊ शकतो. परंतु मला पूर्णपणे नष्ट करून टाकण्यात कुठलाही शहाणपणा नाही. मी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मनुष्यासाठी आणि चांगल्या पर्यावरणासाठी कार्य करीत राहील. 


तर अशा पद्धतीने मी वृक्ष झालो तर संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करील वातावरण स्वच्छ करण्यासोबतच मी मनुष्याला अनेक जीवनावश्यक गोष्टी देखील मोफत उपलब्ध करून देईल. म्हणून मी झाड झालो तर या पद्धतीने सर्वांची मनोभावे सेवा करेल आणि मला यातून खूप आनंद देखील मिळेल. धन्यवाद..

--समाप्त--

तर मित्रांनो हा होता मी झाड झालो तर निबंध मराठी. आशा आहे की आपणास हा निबंध आवडला असेल. mi zad zalo tar या विषयावरील माझ्या प्रतिक्रिया मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. if i become a tree essay in marathi तुम्हास कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा आणि ह्या निबंधाला आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद...


अधिक वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने