संत कबीर यांची मराठीत संपूर्ण माहिती | sant kabir information in marathi

संत कबीर मराठी माहिती | kabir information in marathi

sant kabir information in marathi : नमस्कार, आज आपण हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी आणि समाज सुधारक संत कबीर यांची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत.

कबीरदास उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांची प्रमुख भाषा सधुक्कडी होती. परंतू त्यांच्या कवितांमध्ये हिंदी भाषेच्या सर्व मुख्य बोल्यांची झलक दिसते.

संत कबीरदास यांच्या बद्दल हिन्दी आणि इंग्रजी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. परंतु sant kabirdas information in Marathi अर्थात संत कबीर मराठीत माहिती तुम्हाला ह्या लेखामध्ये वाचायला मिळेल.


sant kabir information in marathi

संत कबीर यांचे बालपण व प्रारंभिक जीवन

संत कबीर यांचा जन्म केव्हा व कुठे झाला याविषयी इतिहासकारांमध्ये अनेक मतभेद आहेत. परंतु एका प्रचलित कथेनुसार संत कबीर यांचा जन्म इसवीसन 1440 मध्ये एका गरीब व विधवा ब्राह्मणी च्या घरी झाला. या ब्राह्मणीला ऋषी रामानंद स्वामी यांनी चुकून गर्भवती होण्याचे वरदान दिले.


विधवा ब्राह्मणी ने लोकलाजेच्या भीतीने नवजात बालकाला उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून तीन किलोमीटर दूर लहरताल तलावाजवळ सोडून दिले.


सांगितले जाते की यांनतर नीरू नावाच्या एका विणकराला बालक कबीर दिसले. नीरू हा मुस्लिम धर्माचा व्यक्ती होता. त्याने कबीर यांना आपल्या घरी नेले. यांनतर नीरु व त्याची पत्नी नीमा यांनी संत कबीर यांचे पालनपोषण केले.


संत कबीर यांचे शिक्षण

संत कबीर यांच्या शिक्षणाबद्दल सांगितले जाते की त्यांना आभ्यासात आवड नव्हती. आई वडील गरीब असल्याने मदर्सेत जाऊन शिक्षण प्राप्त करणेही कठीण होते. त्यांचा पूर्ण दिवस अन्नाच्या शोधत जात असे. यामुळेच ते कधीही पुस्तकी शिक्षण प्राप्त करू शकले नाही.


काही इतिहासकारांनुसार असेही म्हटले जाते की संत कबीर यांचे शिक्षक रामानंद स्वामी होते. सुरुवातीला रामानंद स्वामी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. परंतु नंतर एका घटने मुळे संत रामानंद स्वामींना कबीर यांना शिष्य म्हणून स्वीकारावेच लागले, एकदा संत कबीर तलावाच्या पायऱ्यांवर झोपून रामा रामा या मंत्राचा जाप करीत होते. रामानंद सकाळच्या वेळी आंघोळीला जात होते. त्यांनी तलावात उतरण्यासाठी पाऊल ठेवले व त्यांच्या पायाखाली कबीर आले. रामानंद यांना त्यांच्या चुकीचा अनुभव झाला आणि त्यांनी सध्या कबीरांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले.


संत कबीर यांचा धर्म

कबीर यांच्या एका दोह्या नुसार जीवन जगण्याची योग्य पद्धत हाच त्यांचा धर्म आहे. ते धर्माने न हिंदू होते न मुस्लिम. संत कबीर धार्मिक रीतींचे निंदक होते.


समाजात धर्माच्या नावावर सुरू असणाऱ्या कुप्रथांचा त्यांनी विरोध केला. संत कबीरांच्या जन्म शीख धर्मा उदयाच्या काळात झाला होता. त्यामुळे शीख धर्मातही त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो.


संत कबीर यांचे कार्य

कबीर यांनी खूप सारे लिखाण कार्य केले. कबीर यांनी लिहिलेले कविता व गीत अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. ते नाथ परंपरा, सुफी परंपरा इत्यादी मिश्रित अध्यात्मिक स्वभावाचे संत होते. त्यांनी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात भक्ती आंदोलन चालवले.


कबीरांनी लोकांचे डोळे उघडून त्यांना मानवता, नैतिकता व अध्यात्मिकता चा धडा शिकवला. ते अहिंसेचे अनुयायी व प्रचारक होते.


संत कबीर यांचा मृत्यू

संत कबीर यांचा मृत्यू सन 1518 मध्ये मगहर येथे झाला. कबीर यांचे अनुयायी हिंदू व मुस्लिम दोन्ही धर्मात होते. त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार कोणत्या धर्माच्या पद्धतीने करावा यावर वादविवाद होऊ लागले.


हिंदू धर्मियांच्या मानने होते की कबीर हिंदू असून त्यांचे अंतिम संस्कार हिंदू रितीनी करावे याशिवाय मुस्लिम लोक मनात असत की कबीर मुस्लिम होते व त्यांचा अंतिम संस्कारही मुस्लिम धर्माप्रमाणेच करावा.


या भांडणादर्म्यान संत कबीर यांच्या अंगावरील चादर उडाली व त्यांच्या शरीराच्या जागी काही फुले होती. यांनतर हिंदू व मुस्लिम दोघांनी ही फुले आपापसात वाटून आपापल्या पद्धतीने अंतिम संस्कार केले.


तर मित्रहो ही होती संत कबीर मराठीत माहिती. आशा आहे की sant kabir information in marathi आपणास उपयोगी ठरली असेल आणि आपण ह्या संत कबीर यांच्या चरित्रातून योग्य बोध घेतला असेल. ह्या माहितीला इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून आपले मित्र व कुटुंबीय मंडळींनाही ही माहिती प्राप्त होईल धन्यवाद.. 


अधिक वाचा :

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने