लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak Essay in Marathi

Lokmanya Tilak Essay in Marathi : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारी वीर आणि देशभक्तांनी आपले जीवन समर्पित केले. अशाच महान नेत्यांपैकी एक होते लोकमान्य टिळक. 

आज आपण देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या महान नेत्यावरील लोकमान्य टिळक मराठी निबंध पाहणार आहोत. हा Lokmanya Tilak Essay in Marathi आपणास टिळकांच्या जीवनाची माहिती देईल व याचा उपयोग आपण लोकमान्य टिळकांचे भाषण तयार करण्यासाठी देखील करू शकतात. 


लोकमान्य टिळक निबंध मराठी | Lokmanya Tilak Essay in Marathi

गांधीवादी विचारांच्या विरुद्ध लोकमान्य टिळक हे उग्रवादी विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे नेता होते. लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचे व्यक्तित्व महान होते. त्यांनी देशवासीयांना एकजूट होऊन संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या संघर्षाने एका नवीन युगाची सुरुवात केली. बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिखली गावी झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधर पंत हे एक शिक्षक आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. 


टिळकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून 1879 मध्ये बीए ची डिग्री मिळवली. त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते की टिळक वकिली करून पैसे कमावतील. परंतु टिळकांनी आपले जीवन देश सेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले. 1871 साली 15 वर्षाच्या वयात त्यांचा विवाह ताराबाई नावाच्या मुलीशी करण्यात आला. 1980 मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि त्याच्या काही वर्षानंतर 1985 मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. या ठिकाणी ते कोणताही पगार न घेता काम करत असत. 


टिळक भारताचे एक प्रमुख नेता, समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी सर्वात आधी ब्रिटिश राजमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केली. टिळकांनी सन 1980 पासूनच भारतीय राजनीतीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 1881 मध्ये स्वतःची दोन वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांचे नाव केसरी व मराठा होते. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी सरकार विरुद्ध टीका करणे सुरू केले. देशातील जनतेला इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास प्रोत्साहित केले. 


त्यांच्या या कार्यामुळे ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप लावला. व त्यांना सहा वर्षे मांडाल्याच्या तुरुंगात कारावासाची शिक्षा ठोठावली. मांडाल्याच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर आल्यावर जेव्हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. तेव्हा देशात आंदोलनाची लाट उसळली. महाराष्ट्रात शिवजयंती व गणपती उत्सव सुरू केले. या सणांना सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे हा होता. टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लढत राहिले. आणि 1 ऑगस्ट 1920 ला न्यूमोनिया या आजाराने त्यांची आकस्मात मृत्यू झाली. टिळकांच्या अंत्ययात्रेत दोन लाखांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणार्‍या या महान नेत्याला 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हटले जाते.

--समाप्त--


Lokmanya Tilak Essay in Marathi शिवाय या निबंधाला पुढील प्रमाणे शीर्षक देखील देता येईल.  

  • लोकमान्य तिलक मराठी निबंध 
  • मला भावलेले लोकमान्य टिळक निबंध मराठी
  • माझा आवडता नेता लोकमान्य टिळक निबंध
  • लोकमान्य टिळकांचे बालपण

तर मित्रांनो हा होता लोकमान्य टिळक मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay in Marathi). तुम्हाला हा मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. व इतर कोणत्याही विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhasahnmarathi.com ला.  Lokmanya Tilak Essay in Marathi

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने