स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी माहिती | Swatantra veer Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती - Swatantra Veer Savarkar Information in Marathi : विनायक दामोदर सावरकर ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही संबोधले जाते. वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्वाचे स्थान मिळवले आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आजही काही लोक त्यांना सांप्रदायिक, कुटील आणि देशाचा शत्रू म्हणून संबोधित करतात.

आजच्या या लेखात आपण विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास, मराठी माहिती आणि संपूर्ण जीवन परिचय पाहणार आहोत. तर चला सुरू करू...


Swatantra Veer Savarkar Information in Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती - Swatantra Veer Savarkar Information in Marathi

विनायक दामोदर सावरकर यांची संपूर्ण माहिती व संपूर्ण जीवन चरित्र आपणास पुढे देत आहोत. ही स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी माहिती आपणास नक्कीच उपयोगाची ठरेल. 


प्रारंभिक जीवन Swatantra veer Savarkar marathi mahiti

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जवळ असलेल्या भागुर गावात झाला. त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर तर आईचे नाव राधाबाई. सावरकर यांना 2 भाऊ व एक बहिण होती. वीर सावरकर जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाच्या सात वर्षानंतर प्लेग च्या महामारी मध्ये त्यांचे वडीलही वारले.

वडिलांचा मृत्यू नंतर त्यांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. सावरकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय, नाशिक येथून केले. शाळेत असताना ते शिवजयंती व गणेश उत्सव हे सण मोठ्या आनंदाने आयोजित करत असत. या सणांना लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. सावरकर या सणाच्या वेळी देशभक्ती व राष्ट्रवादी नाटके करत असत.

मार्च 1901 मध्ये त्यांनी रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची मुलगी यमुनाबाई शी विवाह केला. त्यांच्या सासऱ्यानी त्यांना पुढील शिक्षणासाठी पैसे पुरवले. व 1902 मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीए ची डिग्री प्राप्त केली. 


स्वातंत्र्यता आंदोलनात योगदान

1904 साली पुण्यात सावरकरांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली. ते स्वदेशी आंदोलनातही सहभागी होते. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी विदेशी कपड्यांची होळी जाळली. त्यांच्या भडकाऊ देशभक्ती भाषणांनी नाराज, इंग्रज शासनाने त्यांची बी ए ची डिग्री परत घेतली.

1906 मध्ये त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली. व ही शिष्यवृत्ती सोबत घेऊन जून 1906 मध्ये ते बॅरिस्टर बनण्यासाठी लंडनला गेले. ज्यावेळी ते इंग्लंड मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी तेथे भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रज प्रशासनाविरुद्ध भडकावण्यास सुरुवात केली. 


स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित पुस्तक: द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857

जून 1908 मध्ये त्यांनी एक पुस्तक 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857' लिहून संपवले. परंतु ब्रिटिश शासनाने भारत व इंग्लंड दोघी ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालवली. नंतर या पुस्तकाला हॉलंड मधील मॅडम भीकाजिकामा द्वारे प्रकाशित करण्यात आले होते. आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतिकार्या पर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यासाठी त्याची तस्करी करण्यात आली. 


सावरकरांना ब्रिटिशांद्वारे अटक

ज्यावेळी तात्कालिक नाशिक चे कलेक्टर, ए एम टि जॅक्सन ला गोळी मारून हत्या करण्यात आली त्यावेळी सावरकरांना ब्रिटिशांनी पकडले. इंडिया हाऊस सोबत त्यांच्या संबंधाचा संदर्भ देऊन त्यांना या हत्येमध्ये फसविण्यात आले. सावरकरांना 13 मार्च 1910 ला लंडनमध्ये अटक करून भारतात पाठवण्यात आले. त्याच्यावर हत्यारांची अवैध वाहतूक, भडकाऊ भाषण आणि राजद्रोह चे आरोप लावण्यात आले व 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. 


काळ्यापाण्याची शिक्षा

काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये दिली जायची. काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना कठीण परिश्रम करावे लागायचे. येथील कैद्यांना नारळ सोलून त्यामधील तेल काढावे लागायचे. त्यांना बैलाप्रमाने जुतून मोहरी व नारळाचे तेल काढले जायचे. यासोबतच त्यांना जैल व बाहेरील जंगलांची साफसफाई करावी लागायची. काम करीत असताना थांबले तर त्यांना कठीण शिक्षा दिली जायची. चाबूक ने त्यांना मारले जायचे. एवढी मेहनत करूनही त्यांना भरपेट जेवण दिले जायचे नाही.

जवळपास 10 वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर, 1920 साली बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि वल्लभ भाई पटेल या सारख्या मोठ्या नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेचे मागणी केली. 2 मे 1921 मध्ये त्यांना सेल्युलर जेल मधून रत्नागिरी येथील तुरुंगात पाठवण्यात आले. रत्नागिरी तुरुंगात असतांना त्यांनी 'हिंदुत्व' हे पुस्तक लिहिले. 6 जानेवारी 1924 ला त्यांना, 'ते ब्रिटिश कायद्याचे पालन करत रत्नागिरी जिल्ह्यातच राहतील' या अटीवर सोडण्यात आले. 

आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी 23 जानेवारी 1924 ला रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली. या संघाचा उद्देश भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षित करून समाजाचे कल्याण करणे होते. नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टी मध्ये सामील झाले. त्यांना हिंदुमहासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. नंतरच्या काळात हिंदुमहासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला. गांधीजींच्या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे याने 1948 मध्ये गोळी मारून गांधीजीची हत्या केली. गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांनाही अटक केली परंतु त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. 


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यू 

26 फेब्रुवारी 1966 ला विनायक दामोदर सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर) यांचा 83 वर्षाच्या वयात मृत्यू झाला.


तर मित्रांनो ही होती स्वातंत्र्यवीर सावरकरां बद्दल महत्वाची माहिती: Swatantra veer Savarkar Information in Marathi मला आशा आहे की तुम्हाला ही माहीती नक्कीच उपयुक्त ठरली असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद...


Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने