वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | Vruttapatra che manogat Nibandh Marathi

वृत्तपत्राची आत्मकथा | Vruttapatrachi aatmkatha marathi nibandh

वृत्तपत्र किंवा वर्तमान पत्र फार आधीच्या काळापासून वाचले जात आहे. आजच्या आधुनिक युगात जरी वृत्तपत्राचे वाचन कमी झाले असले तरी वृत्तपत्र वाचनाचे महत्व फार आहे. आजच्या या लेखात आपण Vruttapatra che manogat या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. हा वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध तुम्हाला शाळेचा अभ्यास म्हणून नक्कीच उपयोगात येईल.  



वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध | (Vruttapatra che manogat) 

मी एक वृत्तपत्र बोलत आहे. माझा जन्म आजपासून जवळपास दीडशे वर्षांपूर्वी झाला होता. लोक तेव्हापासूनच मला वाचत आहेत. मी खूप कमी किमतीत उपलब्ध असतो. आधीच्या काळात माझ्या एका प्रतीची किंमत काही पैसे होती परंतु आता 2 ते 5 रुपये आहे. अनेक ठिकाणी मला घरोघरी पोहचवण्यासाठी माणूस लावलेला असतो. बऱ्याचदा मला पोहचविणार्या व्यक्तीला उशीर झाला की घरातील सदस्य चवताळून जातात. माझ्या मधील बातम्या वाचायला लोकांना खूप आवडते. सकाळी सकाळी चहा चा स्वाद घेत मला वाचले जाते. 


माझ्या मध्ये वेगवेगळ्या बातम्या छापलेल्या असतात. देशाच्या कोणत्या भागात काय होत आहे, देशात काय समस्या सुरू आहे, कुठे काय अपराध झाला याशिवाय बॉलिवुड, राजनीती इत्यादी संबंधित बातम्या माझ्यामध्ये येतात. आधीच्या काळात मला खूप जास्त मागणी होती. आजच्या आधुनिक इंटरनेट च्या युगात सर्व लोक इंटरनेट वर माहिती प्राप्त करतात. ते वृत्तपत्र वाचत नाही. आजकाल वृत्तपत्रांऐवजी रेडिओ, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट इत्यादी माहितीची साधने उपलब्ध आहेत. परंतु येवढे असले तरीही वाचनाची आवड असणारे सर्वच लोक मला वाचणे पसंद करतात.


काही लोकांना तर वृत्तपत्र वाचण्याची एवढी सवय असते की त्यांना वृत्तपत्र शिवाय चैन पडत नाही. मला तयार करीत असताना सर्वात आधी बातम्या गोळा करून त्यांना संगणकाच्या सहायाने टाईप करून व्यवस्थित प्रत बनवली जाते. यांनतर मला मशिन मध्ये छापले जाते. ज्या शहरात माझ्या प्रति तयार होतात तेथून वेगवेगळ्या गावांमध्ये वाहतुकीच्या साधनांद्वारे मला पाठवले जाते. यांनतर वर्तमान पत्र वाटणारे लोक मला घराघरापर्यंत पोहचवतात. मला या प्रवासात खूप आनंद मिळतो. जेव्हा लोक मला उघडून वाचतात तेव्हा मला दुसऱ्याच्या कामी आल्याचे सुख प्राप्त होते.


प्राचीन काळापासून तर आजच्या आधुनिक युगापर्यंत मी अनेक लोकांची मदत केली आहे. आधीच्या काळात जेव्हा भारत इंग्रजांचा गुलाम होता, तेव्हा माझ्या मध्ये छापलेल्या बातम्या वाचून अनेक लोक इंग्रजांविरुद्ध एकत्रित झाले होते. अनेक महान भारतीय नेत्यांनी माझ्या सहाय्याने संपूर्ण देशातील जनतेपर्यंत आपले विचार पोहचवले होते. म्हणूनच मी या देशासाठी, व समाजासाठी महत्त्वाचे योगदान बजावतो. मला एकाग्र चित्त होऊन वाचल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. म्हणून प्रत्येकाने दररोज अर्धा तास तरी वृत्तपत्र वाचायला हवे.


वृत्तपत्र बंद पडली तर मराठी निबंध


या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणेही असू शकते. 

वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध 

वृत्तपत्राची आत्मकथा 

वृत्तपत्राचे आत्मवृत्त

Vruttapatra che manogat

Vruttapatrachi aatmkatha   

Newspapaer Autobiography In Marathi 


तर मित्रांनो आशा करतो की हा मराठी निबंध तुम्हाला आवडला असेल. या शिवाय मराठी भाषेतील कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आमची वेबसाइट bhashanmarathi.com वर सर्च करा. धन्यवाद

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

6 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने