खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache mahatva in marathi

Khelache mahatva in marathi: मित्रांनो आजच्या या लेखात आपण खेळांचे महत्व पाहणार आहोत. जगात कोणताही व्यक्ति असो त्याने कधी न कधी कोणता न कोणता खेळ खेळलेलाच असतो. खेळाचे अनेक फायदे आहेत आणि या लेखाद्वारे मी तुम्हाला तेच फायदे सांगणार आहे. 

हा लेख तुम्ही जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध म्हणूनही वापरू शकतात तर चला आजच्या या लेखाला सुरू करूया.    



खेळाचे महत्व मराठी निबंध | Khelache mahatva nibandh marathi

मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी शरीर असणे आवश्यक आहे. एका निरोगी शरीरातूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होती. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व भरपूर आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे. खेळ खेळल्याने तंदुरुस्ती सोबत मनोरंजनही होते. 


कोणताही खेळ खेळल्याने व्यक्तीचा शारीरिक विकासासोबत मानसिक विकासही होतों. खेळताना डोळे, मेंदू व शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करावा लागतो. खेळांमुळे शरीराचे संतुलनही वाढते. नियमित कोणतातरी खेळ खेळल्याने चित्त प्रसन्न राहते. शारीरिक अवयवांचा व्यवस्थित विकास होतो. मनात उल्हास आणि उत्साह वाढून आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. 


खेळांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात काही खेळ शारीरिक तर काही मानसिक असतात. शारीरिक खेळ खेळण्यासाठी शरीराला श्रम करावे लागते, तर मानसिक खेळांमध्ये मेंदूचे कार्य असते. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, क्रिके, टेनिस, कबड्डी इत्यादी शारीरिक खेळ आहेत. या खेळांना खेळण्यासाठी शारीरिक ताकत लागते. दुसरीकडे बुद्धिबळ, पत्ते, चौपट इत्यादी मानसिक खेळ आहेत, ज्यांना खेळण्यासाठी मानसिक शक्तीचा वापर करावा लागतो. 


या शिवाय इनडोर आणि आऊटडोर खेळांचे प्रकार आहेत. आजकाल इनडोर खेळांमध्ये कॉम्प्युटर व मोबाईल गेम्स मोठ्या प्रमाणत खेळले जात आहेत. परंतु हे खेळ तुमचे स्वस्थ सुधारणा ऐवजी बिघडवित आहेत. 


बाहेर खेळाला जाणार खेळ कोणताही असो तो आपल्या शरीराला स्वस्थ आणि मनाला प्रसन्न करतो. खेळ मनुष्याचा व्यक्तिमत्त्व विकास करतात. ते एकमेकांमध्ये सहकार्य व बंधुता वाढवतात. खेळांमुळे परंपरा सन्मान आणि प्रेम देखील वाढते. अश्या पद्धतीने खेळ आपल्याला गुणवान, चारित्र्यवान आणि एक खरा व्यक्ती बनवतात.


तर मित्रांनो हा होता जीवनातील खेळांचे महत्व या विषयावरील मराठी निबंध. ज्याप्रमाणे खेळांचे महत्व आहे अगदी त्याच पद्धतीने व्यायामाचे महत्व देखील खूप आहे. व्यायामाचे महत्व हा निबंध वाचा येथे 

तर मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद


  • Read more 
  1. वेळेचे महत्व मराठी निबंध 
  2. मराठी भाषेचे महत्व मराठी निबंध 
  3. कष्टाचे महत्व मराठी निबंध 
  4. शिक्षणाचे महत्व मराठी निबंध  
  5. वाचनाचे महत्व मराठी निबंध 
  6. स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने