[निबंध] माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मराठी निबंध | Maza avismarniya prasang

आजच्या या लेखात आपण माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग निबंध पाहणार आहोत. हा मराठी निबंध सर्वच तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तर चला सुरू करूया.. 



माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण निबंध 

माझे जीवन अनेक घटनांनी भरलेले आहे, परंतु माझ्या आयुष्यात असाही एक प्रसंग आहे ज्याला मी कधीही विसरू शकत नाही. या प्रसंगात मी जीवन व मृत्यूला समोरासमोर पाहिले होते. जीवन मला एकीकडे ओढत होते आणि मृत्यू दुसरीकडे. ज्या पद्धतीने दोन लहान मुले चेंडूला इकडून तिकडं फेकतात. त्याच पद्धतीने मी जीवन व मृत्यू दोघांच्या मधोमध इकडून तिकडे होत होतो. परंतु शेवटी जेवणाचा विजय झाला. आणि त्या कठीण परिस्थितीतून मी बचावलो. परंतु आजही त्या प्रसंगाला आठवण करून माझ्या शरीरावर शहारे येतात. 

माझे आवडते पर्यटन स्थळ मराठी निबंध वाचा येथे 


हा प्रसंग फार जुना नाही फक्त तीन-चार वर्षे झाली असतील. आमच्या शाळेला उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. जवळपास तीन महिने सुट्टी असल्याने आम्ही मित्रांनी काश्मीर फिरायला जाण्याचा निश्चय केला. आमच्या मधील एक मित्र आधीच काश्मीर ला पोहोचला. व आमच्या आवडीला लक्षात ठेवून त्याने राहण्यासाठी एक हाऊस बोट भाड्यावर घेतली. पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजावर बनवल्या जाणाऱ्या घरांना 'हाऊस बोट' म्हटले जाते.


दोन दिवसानंतर आम्ही सर्व मित्र काश्मीर ला पोहोचलो. मी आयुष्यात पहिल्यांदा हाऊस बोट पाहिली होत. आमची हाऊस बोट काश्मीरमधील डल झील वर होती. डल झील जवळपास 18 किलोमीटर क्षेत्रात पसरली आहे व तिच्या तीनही बाजूंना मोठ-मोठे पर्वत आहेत. डल झील सारखा निर्मळ व सुंदर तलाव मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. आम्ही आमच्या हाऊस बोट मध्ये शिरलो. बोट च्या बाहेर सुंदर तलाव आणि सुंदरश्या हाऊस बोट मध्ये आम्ही सर्व मित्र सकाळ संध्याकाळ जेव्हाही इच्छा झाली तेव्हा तलावात उडी घ्यायचो. आणि जोपर्यंत आंघोळ करून थकत नाही तोपर्यंत मस्ती करायचो.


एक दिवस आम्ही सर्व मित्रांनी डल झील च्या दुसर्‍या किनार्‍यावर असलेल्या शालिमार बागे पर्यंत जाण्याचा निश्चय केला. खाण्यापिण्याचे सामान, हार्मोनियम व इतर वस्तू नाव मध्ये ठेवून, सोबत एका नाविकाला घेऊन आम्ही शालीमार बागेकडे निघालो. दिवस छान होता म्हणून नाव चालवण्यात आनंद येत होता. परंतु जसेही आमची नाव डल झीलच्या मधोमध पोहोचली तसे आकाशात ढग दाटून आले. 


आमच्या सोबत असलेल्या नाविकाने आम्हाला पुढे न जाता लवकरात लवकर परत फिरण्यास सांगितले. कारण समोरून जोरदार वादळ येण्याचे भय होते. परंतु आम्ही त्यांच्या सल्याचा विरोध केला. आणि सर्वाधिक विरोध मीच केला. मी सांगितले की जेवढा वेळ आपल्याला परत जाण्यास लागेल तेवढ्या वेळात तर आपण शालिमार बाग पर्यंत पोहचून जाऊ. नाविकाला नाईलाजाने आमचे म्हणणे मान्य करावे लागले. आता आम्ही सर्वजण दुप्पट उत्साहाने नाव चालवू लागले. 


या गोष्टीला दहा मिनिटे झाली होती एवढ्यात हवेचा एक हलकासा झोत आमच्या डोक्यावरून गेला. नाविकाने आम्हाला संपूर्ण बळ लाऊन नाव ढकलायला लावली. परंतु आकाश फार चंचल झाले होते. सुंदर ढग भयंकर विजेने कडाडू लागले. शांत असलेल्या डल झील मध्ये भयंकर लाटा वाहू लागल्या. लहरींच्या झटक्यामुळे आमची नाव वरखाली होऊ लागली. भयंकर परिस्थितीत मृत्यू समोर उभी होती आम्ही जगण्याची आशा सोडून दिली. नाविक आम्हाला धैर्य ठेवण्यास सांगत होता. परंतु आमच्या मनाचे संतुलन बिघडले होते. आणि एवढ्यातच एक जोरदार लाट आली व आमची नाव पलटली. 


यानंतर काय झाले मला काहीच माहित नाही. परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला श्रीनगर मधील एका रुग्णालयाच्या पलंगावर पाहिले. मी खूप घाबरलो, समोर उभ्या असलेल्या एका नर्सला माझ्या मित्रांबद्दल व मी येथे कसा आलो हे विचारले. नर्स मला सांत्वना देत म्हणाली की माझ्या सर्व मित्रांना सुखरुप वाचवण्यात आले आहे. व ते सर्व याच दवाखान्यात आहेत. नंतर मला माहीत पडले की आमची नाव किनाऱ्यावर येऊन पलटली होती. व समोर असणाऱ्या काही नाविकांनी आमचे आवाज ऐकून आम्हाला वाचवले होते. या नंतर मी आम्हाला वाचणाऱ्या सर्व लोकांना मनोमन धन्यवाद दिले. 


आज या घटनेला घडून जवळपास चार वर्षे झाली आहेत, परंतु तरही असे वाटते की हा कालचाच प्रसंग आहे. जीवन व मृत्यू हे सर्व परमेश्वराच्या हातात असते. म्हणूनच मला व माझ्या मित्रांना या कठीण प्रसंगातून वाचवल्याबद्दल मी नेहमी परमेश्वराचे धन्यवाद करीत असतो. अंगावर शहारे उभे करणारा हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता.

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

3 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने