आपला देश भारताला संतांची भूमी म्हटले जाते. विशेष करून महाराष्ट्रात अनेक महान संत होऊन गेले ज्यांनी आपल्या महान कार्याने समाजात मोलाचे परिवर्तन घडवून आणले. महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्रात कोणते न कोणते महान संत झालेले आहेत. आजच्या या लेखात आपण अश्याच एक महान संतांचे जीवन चरित्र पाहणार आहोत या संतांचे नाव आहे संत एकनाथ. संत एकनाथांनी लोकांना भक्तीच्या मार्गावर चालायला शिकवले.
तर चला पाहूया संत एकनाथ यांची माहिती ही sant eknath information in Marathi तुम्हाला विविध ठिकाणी नक्कीच उपयुक्त ठरेल.
जन्म व प्रारंभिक जीवन
संत एकनाथ यांचा जन्म इसवी सनाच्या 15 व्या शतकात महाराष्ट्रातील पैठण गावातील संत भानुदास यांच्या कुळात झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा होते. ते सूर्याची उपासना करीत असत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे म्हणजेच संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण ठेवले. एकनाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते.
एकनाथ लहान असतानाच त्यांचे आई वडील वारले. ज्यामुळे त्यांची आजी सरस्वती व आजोबा चक्रपाणी यांनी त्यांना मोठे केले. सहा वर्षाच्या कमी वयातच त्यांनी आपल्या बुद्धीने लोकांना चकित करण्यास सुरुवात केली. त्यांची बुद्धिमत्ता व तर्कशक्ती पाहून मोठमोठे विद्वान चकित व्हायचे.
संत एकनाथांचे कार्य
संत एकनाथांचे गुरु सद्गुरू जनार्दन स्वामी होते. जनार्दन स्वामींनी त्यांना अनेक महत्त्वाचे उपदेश दिले. जनार्दन स्वामी हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते भगवान दत्ताचे उपासक होते.
जनार्दन स्वामींकडे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परमेश्वराच्या भक्तीत लागून गेले. संत एकनाथ महान संत होते त्यांनी आपल्या जिवंत अनेक महान कार्य केले. त्यांनी भागवत पुराण ला आपल्या भाषेत लिहिले. या ग्रंथाला त्यांनी एकनाथी भागवत नाव दिले. संत एकनाथ प्राचीन काळापासून चालत आलेल्या कुरितीच्या विरुद्ध होते.
संत एकनाथांच्या जीवनातील चमत्कारी घटना
परमेश्वराचे परम भक्त संत एकनाथांच्या जीवनकाळात अनेक चमत्कारिक प्रसंग घडले. यातील काही प्रसंग पुढील प्रमाणे आहेत.
सांगितले जाते की एकनाथ ज्या रस्त्याने गोदावरी स्नान करून परत जात असत त्या रस्त्यावर एक दृष्ट मौलवी उभा राहून त्यांच्यावर दररोज गुळण्या टाकायचा, ज्यामुळे ते अपवित्र होऊन जायचे. परंतु एकनाथ त्याला काहीही न बोलता पुन्हा एकदा स्नानाला निघून जात असत.
एकदा त्या दृष्टांने त्यांच्यावर 108 वेळा गुळण्या केल्या. पण संत एकनाथ काहीही न बोलता परत अंघोळ करून येत असत. शेवटी जेव्हा त्याचे तोंड दुखून आले तेव्हा तो संत एकनाथांच्या चरणात पडून क्षमा मागू लागला. परंतु एकनाथ त्याला प्रतिउत्तर देत म्हणाले की तुझ्या मुळेच मी 108 वेळा गोदावरी स्नानाचे पुण्य कमावले.
एकदा काही दृष्ट ब्राह्मणांनी संत एकनाथांची परीक्षा घेण्यासाठी व त्यांना क्रोधित करण्यासाठी एका व्यक्तीला पाठवले. तो व्यक्ती संत एकनाथांच्या घरी जाऊन त्यांच्या पाठीवर चढून बसला. एकनाथ त्याला म्हणाले तुझी मस्ती पाहून मला आनंद झाला.
आता तो व्यक्ती त्यांना क्रोधित करण्यासाठी त्यांची पत्नी गिरजाबाई च्या पाठी वर जाऊन बसला. परंतु तरही एकनाथ थोडेही क्रोधित न होता गिरजाबाईंना म्हणाले: “जरा सांभाळून त्या बालकाला व्यवस्थित धर तो पडून जाईल”. यावर गिरजाबाईं म्हणाल्या तुम्ही चिंता करू नका मला मुले सांभाळण्याची सवय आहे. अश्या पद्धतीचे महान संत एकनाथ होते. संतांना क्रोध काय माहीत नसते.
संत एकनाथांची समाधी
संत एकनाथांचे मानणे होते की फक्त पूजा पाठ केल्याने व्यक्ति ब्राह्मण होत नाही तर व्यक्तीचे सत्कर्म आणि शुद्ध आत्माच त्याला महान बनवते. जे लोक जातीच्या नावावर भेदभाव करतात ते ढोंगी, पाखंडी आणि अल्पज्ञानी असतात.
सत्याचा मार्ग दाखवीत संत एकनाथांनी सन 1656 ला गोदावरीच्या तटावर महासमाधी घेतली.
- Read More