ग्रो ॲप द्वारे गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या पूर्ण माहिती | Groww App Information in Marathi

मित्रांनो आपल्या हातात असणाऱ्या अँन्ड्रॉईड फोन च्या सहाय्याने आपण अनेक अशी कामे करू शकतो जी पूर्वी करण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागत होते. आणि यापैकीच एक आहे स्टॉक मार्केट आणि mutual fund investment. आजकाल प्रत्येकजण घरबसल्या मोबाइल अप्प च्या सहाय्याने शेअर मार्केट व म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो. 

ऑनलाइन गुंतवणुकीसाठी अनेक ॲप बाजारात उपलब्ध आहेत आणि यापैकीच एक आहे ग्रो ॲप. Groww App हे जवळपास 7-8 वर्षांपासून भारतीय बाजारात कार्यरत असून हे app पूर्णपणे भारतीय आहे. Groww App Information in Marathi या लेखात आपण ॲप विषयी ची काही उपयुक्त माहीती प्राप्त करूया.  
ग्रो ॲप मराठी माहिती - Groww App Information in Marathi

Groww हे एक अँड्रॉइड ॲप आणि वेबसाईट स्वरूपात उपलब्ध असलेले माध्यम आहे आणि याद्वारे वापरकर्ते म्युचल फंड(Mutual fund), शेअर मार्केट(Stock Market) आणि डिजिटल सोने इत्यादी मध्ये investment करू शकतात. या एप्लीकेशन द्वारे करण्यात आलेली इन्व्हेस्टमेंट आपण नियमित चेक करू शकतात व आपल्या गुंतवणुकीवर झालेला नफा व तोटा पाहू शकतात.

Groww app सुरुवातीला फक्त mutual fund मध्ये काम करीत होते परंतु मागील काही वर्षांपासून त्यांनी शेअर मार्केट आणि सोने इत्यादी मध्ये देखील गुंतवणुकीची संधी देण्यास सुरुवात केली आहे. या ॲपद्वारे तुम्ही सहज भारतीय शेअर बाजारात आणि म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करू शकतात. 


Groww app company in Marathi

Groww ॲप ची सुरुवात Nextbillion टेक्नॉलॉजी या कंपनी द्वारे करण्यात आलेली आहे. ही कंपनीच ग्रो ची डेव्हलपर आहे. नेक्स्टबिलियन टेक्नॉलॉजी कंपनीचे ऑफिस बेंगलोर, कर्नाटक मध्ये आहे. या कंपनीचे सीईओ (CEO) ललित केसरी हे आहेत. ललित यांच्यासोबतच हर्ष जैन, नीरज सैनी, ईशान बंसल इत्यादी त्यांच्या सोबती सोबत ही कंपनी चालवली जाते. या कंपनीला सर्वात आधी एप्रिल 2016 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. 

ग्रो ॲप ला प्ले स्टोअर वर 1 कोटी पेक्षा अधिक लोकांनी डाउनलोड केलेले आहे. व या ॲप ला आजपर्यंत 4.3 स्टार ची रेटिंग मिळालेली आहे. ही रेटिंग तीन लाख पेक्षा अधिक वापरकर्त्या द्वारे देण्यात आलेली आहे.  


गुंतवणुकीवर मिळवा तब्बल 12% व्याज! कसे? जाणून घ्या येथे


ग्रो ॲप चे अकाउंट बनवण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

ग्रो ॲप मध्ये आपल्या अकाउंट बनवण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहेत. ही कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • बँक अकाउंट 
  • सेल्फी 
  • तुमची सही 
  • चालू असलेला मोबाईल नंबर


जर आपल्याकडे ही सर्व डॉक्युमेंट असतील तर आपण अगदी सहजच ग्रो ॲप मध्ये आपल्या अकाउंट उघडू शकतात व अतिशय कमी वेळात आपले अकाउंट मान्य देखील होऊन जाईल. 


Groww ॲप मध्ये अकाउंट कसे बनवावे?

Groww ॲप वर आपले अकाउंट बनवण्यासाठी सर्वात अगोदर पुढे दिलेल्या लिंक द्वारे प्ले स्टोअरवरून Groww एप्लीकेशन डाउनलोड करा.

Download
Note: जर आपण वर दिलेल्या लिंक वरून ॲप डाऊनलोड कराल तर आपणास शंभर रुपये अकाउंट ओपनिंग बोनस मिळेल.


Download झाल्यानंतर आपणास ॲप ओपन करायचे आहे. येथे आपल्यासमोर continue with Google असे ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करावे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल तो टाकून मोबाईल नंबर verify करावा. 
यानंतर आपणास आपल्या पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर create account चे ऑप्शन आपणास दिसेल त्यावर क्लिक करावे. यानंतर तुम्हाला proceed to Aadhar Esign या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे व आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर आणखी एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून पुढे proceed करावे. 

यानंतर पुढे आपल्यासमोर अशा प्रकारचे एक स्क्रीन ओपन होईल जेथे आपणास आपली सही करून Save म्हणायचे आहे.

इथपर्यंतचे सर्व स्टेप पूर्ण केल्यानंतर Digilocker Documents For KYC चे डॅशबोर्ड ओपन होईल. ज्यामध्ये आपणास proceed for kyc वर क्लिक करायचे आहे. येथे आपला आधार क्रमांक टाकून डीजीलोकर द्वारे आपले अकाउंट सिक्युअर करावे. यानंतर काही वेळा तुमच्या अकाउंट ऍक्टिव्हेट होऊन जाईल.
ॲप मध्ये अकाउंट activate झाल्यानंतर आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये ग्रो द्वारे इन्वेस्टमेंट करू शकतात व उत्तम रिटर्न मिळवू शकता.


प्रश्न उत्तरे

Groww App कोणत्या देशाचे आहे?

आपणास वर लेख वाचत असतांना या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल. Groww app चे  हेडक्वाटर हे  बंगळूर, कर्नाटक, इंडिया येथे स्थित आहे. या कंपनी चे संस्थापक एक भारतीय आहेत. या app ला Nextbillion Technology या कंपनी द्वारे बनवण्यात आलेले आहे. यावरून हे सिद्ध होते की groww हे पूर्णपणे भारतीय app आहे.


तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत groww या ॲपची मराठी माहिती शेअर केली. या Groww App Information in Marathi मध्ये आम्ही आपल्यासोबत ग्रो ॲप चे अकाऊंट कसे बनवावे याबद्दल देखील चर्चा केलेली आहे. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगाची ठरली असेल. या लेख इतरांसोबत देखील नक्की शेअर करा. धन्यवाद..


अधिक वाचा 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने