इंटरनेट नसते तर मराठी निबंध | internet naste tar marathi nibandh

internet naste tar marathi nibandh : मित्रांनो इंटरनेट क्रांति ही आजच्या आधुनिक युगातील एक महत्वपूर्ण क्रांति आहे. इंटरनेट ने संपूर्ण जग जवळ आणले आहे. इंटरनेट चे अनेक फायदे मानवी समाजाला मिळाले आहेत. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे की जर इंटरनेट नसते तर...? 

जर इंटरनेट नसते तर आज आपल्याला एका क्लिक वर मिळणाऱ्या अनेक सुविधा देखील मिळाल्या नसत्या. तर चला आजच्या या लेखात जाणूया इंटरनेट नसते तर मराठी निबंध...


internet naste tar marathi nibandh
internet naste tar


इंटरनेट नसते तर | internet naste tar  

(350 शब्द)

ही कल्पनाच अतिशय विचित्र आहे की जर इंटरनेट नसते तर? कारण आज जरी एखाद वेळेस सकाळची चहा नाही मिळाली तरी चालेल परंतु इंटरनेट शिवाय जगणे जवळजवळ अशक्य आहे. 


इंटरनेटला मराठी भाषेत अंतर्जाल म्हटले जाते. परंतु जास्त करून याला इंटरनेट अथवा नेट म्हणूनच संबोधित केले जाते. नेट चा अर्थ जाळे असा होतो. खरे पाहता इंटरनेट एक जाळेच आहे. ज्याचे अनंत धागे एकमेकांना जोडून एक विशाल आणि गुंतागुंतीची संरचना निर्माण करतात. याची तुलना कोळी च्या जाळ्याशी देखील केली जाऊ शकते. एका सज्ञानुसार आंतरजाल हे एकमेकांशी जोडलेल्या संगणकांचे विशाल विश्वव्यापी नेटवर्क आहे. 


आज इंटरनेटच्या माध्यमाने जगभरातील लोक कॉम्प्युटर व मोबाईलद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहे. इंटरनेटच्या मदतीने च कोरोना सारख्या भीषण महामारीत देखील लोक घरबसल्या आपले उद्योगधंदे सांभाळत आहेत. इंटरनेटच्या मदतीने च आपण घरी बसून कॉम्प्युटर अथवा मोबाईलवर अभ्यास करू शकतो. आजच्या आधुनिक युगात इंटरनेट चे योगदान अतिशय महत्वाचे आहे.


परंतु जर इंटरनेट नसते तर आज आपण जसे जीवन जगत आहोत, तसे जीवन जगणे अशक्य राहिले असते. आज आपण सोशल मीडिया साइट व्हाट्सएप, फेसबूक, इंस्टाग्राम इत्यादींच्या मदतीने आपले नातेवाईक व मित्रांच्या संपर्कात राहतो. परंतु इंटरनेट शिवाय या सर्व गोष्टी करणे अशक्य आहे. जर इंटरनेट नसते तर आपण आपले मित्र व नातेवाईक यांच्याशी संपर्क करू शकलो नसतो. एक दुसर्‍याच्या व्यक्तिगत समस्या, फोटो एकामेकांना पाठवू शकलो नसतो. 


आज इंटरनेटच्या मदतीने गूगल, याहू यासारख्या सर्च इंजिन वर काहीही माहिती सर्च करून मिळवता येते. इंटरनेटच्या मदतीने काही क्षणातच आपल्याला आवश्यक असलेली माहिती आपण प्राप्त करू शकतो. परंतु जर इंटरनेट नसते तर गुगल आणि याहू सारखे सर्च इंजिन देखील राहिले नसते. परिणामी जगभरातील माहिती आपल्याला माहीत झाली नसती. कोणतीही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अनेक पुस्तके वाचावी लागली असती. 


आज इंटरनेटच्या माध्यमाने मनोरंजन करणे सोपे झाले आहे. अनेक लोक टीव्ही सिरीयल, चित्रपट, कार्टून्स, डॉक्युमेंटरीज इत्यादी इंटरनेटवर पाहतात. परंतु जर इंटरनेट नसते तर मनोरंजनासाठी या सर्व गोष्टी पाहता आल्या नसत्या. या शिवाय इंटरनेटमुळे आजकाल अनेक लोकांचे व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत आणि या घरबसल्या व्यवसायातून लाखोंची कमाई ते करीत आहे.  परंतु जर इंटरनेट नसते तर देशातील बेरोजगारी दर मोठ्या प्रमाणात वाढला असता, बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असती. 


खरे आहे जर इंटरनेट नसते तर आज जी काही प्रगती झाली आहे ती झालेली नसती. परंतु आपण नशीबवान आहोत की आपल्याला इंटरनेट सारखे ब्रह्मास्त्र मिळाले आहे. म्हणून आपण सर्वांनी इंटरनेटचा वापर योग्य पद्धतीने आपल्या प्रगतीसाठी करून घ्यायला हवा.

--समाप्त--


इंटरनेट नसते तर मराठी निबंध | internet naste tar marathi nibandh

(250 शब्द)

सन 1969 मध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स द्वारे सर्वात आधी इंटरनेटचा शोध लावण्यात आला. इंटरनेटचा शोध हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा शोध आहे. इंटरनेटचे माध्यम माने जगभरातील लोक जवळ आले आहेत. इंटरनेट च्या माध्यमाने अनेक मानवी कार्यांना गती प्राप्त झाली आहे. परंतु जर इंटरनेट चे अस्तित्वच नसते तर..? काय झाले असते बर.. 


आज इंटरनेट येवढे आवश्यक बनले आहे की त्याशिवाय जीवनाची कल्पना करणे देखील कठीण आहे. जर इंटरनेट नसते एका संगणकातून दुसऱ्या संगणकात महत्त्वपूर्ण फाईल पाठवणे कठीण झाले असते. आज इंटरनेटच्या मदतीने लोक एक दुसऱ्याला फोटो, व्हिडिओ आणि उपयुक्त माहिती पाठवतात. परंतु जर इंटरनेट नसते तर एक दुसऱ्याशी संपर्क करणे कठीण झाले असते.


आज इंटरनेट च्या मदतीने घरबसल्या वेगवेगळी माहिती प्राप्त करता येते. कोणत्याही रोगांवरील प्राथमिक उपचार, शालेय अभ्यासाची माहिती लोक घरबसल्या मोबाईल मध्ये मिळवतात. परंतु जर इंटरनेट नसते तर कोणतीही माहिती मिळवण्यासाठी अनेक पुस्तके चाळावी लागली असती. आणि तरीही बऱ्याचदा आवश्यक असणारे माहिती मिळाली नसती. 


इंटरनेटच्या माध्यमाने दवाखान्यात पलंग बुक करणे, रेल्वे व विमानाची तिकिटे काढणे, घरबसल्या किराणा मागवणे, नोकरी शोधणे इत्यादी कामे करता येतात. परंतु जर इंटरनेट नसते तर ही सर्व कार्ये करण्यासाठी परत परत घराबाहेर पडावे लागले असते. ज्यामुळे आपला वेळ, पैसा आणि शक्ती तिघेही वाया गेले असते. 


इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, परंतु कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. इंटरनेट रुपी नाण्याच्याही दोन बाजू आहेत. एकीकडे याचे सकारात्मक प्रभाव आहे तर दुसरीकडे अनेक नुकसान देखील आहेत. आज अनेक तरुण तासन तास इंटरनेट चा वापर करताना दिसून जातात. अभ्यास सोडून इंटरनेट वर अनावश्यक व्हिडिओ पाहणे, गेम्स खेळणे, सोशल मीडिया वापरणे इत्यादींमुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खिळखिळे होत आहे. म्हणून इंटरनेट चा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. पालकांनी आपल्या मुलांना इंटरनेट वापराचे फायदे आणि नुकसानही समजावून सांगायला हवेत.

--समाप्त--


तर मित्रांनो हे होते इंटरनेट नसते तर या विषयावरील काही मराठी निबंध. आशा करतो की internet naste tar marathi nibandh तुम्हाला आवडला असेल ह्या निबंधला इतरांसोबत शेअर करून सहकार्य करा धन्यवाद.. 


READ MORE:

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने