क्रिकेट खेळाची मराठी माहिती | Cricket Information in Marathi

आजच्या या लेखात आपण क्रिकेट चा इतिहास व क्रिकेट खेळाची मराठी माहिती मिळवणार आहोत. ही क्रिकेट ची माहिती - cricket information in marathi विद्यार्थी तसेच प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 

आजच्या काळात भारतातील तसेच आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे. गल्ली बोळापासून तर विश्वचषका पर्यन्त क्रिकेट ची लोकप्रियता आहे. फुटबॉल नंतर जगभरात सर्वात पसंतीचा मैदानी खेळ म्हणजे क्रिकेट होय.



क्रिकेट खेळाची माहिती - Cricket information in marathi

पुढे आपणास क्रिकेट खेळाची मराठी माहिती देत आहोत या cricket information in marathi मध्ये क्रिकेट चे नियम व क्रिकेट कसे खेळले जाते याविषयी सांगण्यात आलेले आहे.


क्रिकेट खेळाचे मैदान

क्रिकेट खेळण्यासाठी एका समांतर मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या मधोमध माती पासुन कठोर पिच बनवली जाते. या पिच वर गवत नसते. बाकी मैदानावर आकाराने लहान गवत उगवलेले असते. 

क्रिकेट चे मैदान आकाराने गोलाकार अथवा अंडाकृती असते. क्रिकेट मैदानासाठी काही ठराविक माप नाही, पण सामान्यतः याचा व्यास 450 फूट (137 मीटर) ते 500 फूट (100 मीटर) एवढा असतो. 

मैदानाच्या पिच वर दोन्ही बाजूस 3-3 स्टंप लावलेले असतात. मैदानाच्या पिच ची लांबी 22 मीटर व रुंदी 10 मीटर असते. मैदानाची एक सीमा अथवा बाऊंड्री असते. या बाऊंड्री पुढे मैदान संपते. 


क्रिकेट चे साहित्य

क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू, बँट, हॅन्ड ग्लोज, स्टंप, पॅड इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.


क्रिकेट चे खेळाडू

cricket information in marathi : क्रिकेट चा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. क्रिकेट च्या एका टीम मधील खेळाडू ची संख्या 11 असते. अश्या पद्धतीने दोन्ही टीम्स चे एकूण 22 खेळाडू असतात. दोन्ही टीम चे धरून क्रिकेट मध्ये 22 मुले असतात. यामध्ये काही खेळाडू बॉलर, काही बँट्समन, एक कॅप्टन, एक उप कॅप्टन आणि एक विकेट कीपर असतो.


क्रिकेट खेळाचे नियम

क्रिकेट च्या खेळ मध्ये चेंडूच्या ओव्हरर्स असतात. एक ओव्हर सहा चेंडूची असते. मॅच नुसार खेळातील ओवर्स ची संख्या वेगवेगळी असु शकते. क्रिकेट मध्ये सर्वात आधी टॉस केली जाते. आपण बॅटिंग करावी की बॉलिंग याचा निर्णय टॉस जिंकणारा संघ करतो. बॉलिंग करणाऱ्या संघातील एक बॉलर ठराविक गतीने बॉल बॅटिंग करणाऱ्या व्यक्तीकडे फेकतो. बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला बॉलला बॅट ने मारायचे असते. 

  • जर बॅट ने मारल्यावर बॉल जमिनीला न टेकता सिमे बाहेर गेला तर त्याला षटकार मानून बॅटिंग करणाऱ्या टीम ला 6 रण दिले जातात.
  • जर बॉल एक किंवा त्या पेक्षा जास्त वेळा जमिनीला स्पर्श करून सीमेबाहेर गेला तर त्याला चौका मानले जाते. व चौक्याचे सहा रण मिळतात.
  • जर बॉलिंग व्यवस्थित झाली नाही व बॉल बॅट च्या दिशेने न जाता चुकीच्या दिशेला गेला तर तो वाइड बॉल धरला जातो व तो बॉल ग्राह्य धरला जात नाही. परंतु त्या बॉल चे काही ठराविक रण बॅटिंग करणाऱ्या संघाला दिले जातात.
  • जर एखाद्या बॉल ला बॅट्समन मारू शकला नाही व तो बॉल मागील स्टंपस ला जावून लागला तर आशा परिस्थितीत त्या खेळाडूला आउट मानले जाते. 
  • याशिवाय जर बॉल ला बॅट लागल्यानंतर बॉल जमिनीला स्पर्श न करता कॅच पकडण्यात आला तर त्या परिस्थितिही बॅट्समन आउट घोषित केला जातो.
  • एका संघाची बॅटिंग संपली की दूसरा संघाला बॅटिंग दिली जाते. ज्या संघाने सर्वाधिक रन काढले त्यांना विजेता घोषित केले जाते.


क्रिकेट खेळाची माहिती मराठी - Cricket chi Mahiti

मित्रांनो cricket information in marathi मध्ये आता आपण क्रिकेट विषयी ची अजून काही उपयोगी माहिती पाहूया. पुढे आपणास क्रिकेट खेळाचे फॅक्टस (Cricket Facts in Marathi) देण्यात आलेले आहेत.

  • जगातील प्रसिद्ध खेळांमध्ये सामील असलेल्या क्रिकेट खेळाची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मधून झाली होती. 
  • सुरुवातीला क्रिकेटच्या एका ओव्हर मध्ये 4 बॉल असायचे. परंतु 1889 मध्ये एका ओव्हर मध्ये 4 बॉल चे 5 करण्यात आले. 1922 मध्ये मध्ये 5 चे 8 बॉल करण्यात आले, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर 1947 पासून एका ओव्हर मध्ये 6 बॉल कायम करण्यात आले. 
  • वर्तमानात क्रिकेट खेळ 100 पेक्षा जास्त देशात खेळाला जातो. 
  • क्रिकेट तीन रूपात खेळले जाते. टेस्ट, वन डे आणि ट्वेंटी-ट्वेंटी परंतु या मधून टेस्ट क्रिकेट ला जास्त महत्त्व दिले जाते. 
  • क्रिकेट खेळण्याची पीच 20 मीटर लांब आणि 3 मीटर रुंद असते. 
  • क्रिकेटच्या स्टंप ची उंची 28 इंच असते. 
  • क्रिकेट खेळण्यांच्या बॅटची उंची 970 मिलिमीटर आणि रुंदी 108 मिलीमीटर असते.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 160 ग्रॅम वजनाचा चेंडू वापरला जातो.
  • मुख्यतः क्रिकेटच्या मॅच चे आयोजन दुबई मध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे केले जाते. 
  • 1876-77 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये टेस्ट क्रिकेट मॅच खेळण्यात आले.
  • 20-20 मॅचेस क्रिकेट चे नवीन स्वरूप आहे.
  • टेस्ट क्रिकेट मधील सर्वात मोठी विजय इंग्लंड च्या नावावर आहे. इंग्लंड ने ऑस्ट्रेलियाला 1930 मध्ये 579 रनांनी हरवले होते.
  • भारत एकमात्र असा क्रिकेट संघ आहे ज्याने 60 ओव्हर, 50 ओव्हर आणि 20 ओव्हर मधील विश्वचषक जिंकला आहे. 
  • जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या खेळाचे अनेक वेगवेगळे रूप आहेत. ज्यात इनडोअर क्रिकेट, बीच क्रिकेट, फ्रांसीसी क्रिकेट, क्विक क्रिकेट इत्यादी समाविष्ट आहेत. 
  • अठराव्या शतकात क्रिकेटचा मोठ्याप्रमाणात विकास झाला व या खेळाला इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ म्हणून निवडण्यात आले.
  • सचिन तेंडुलकर क्रिकेटचे पहिले खेळाडू आहेत ज्यांना तिसऱ्या अंपायर द्वारे आऊट देण्यात आले होते. 
  • सचिन तेंडुलकर यांनी विश्वचषकात सर्वात जास्त 8 वेळा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकला आहे. 
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वात जास्त रन बनवण्याच्या खिताब सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे.
  • सचिन तेंडुलकर चे पूर्ण नाव काय आहे? "सचिन रमेश तेंडुलकर".
  • पाकिस्तानी फलंदाज शाहिद आफ्रिदीने जेव्हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक लावले होते तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता.
  • क्रिकेट खेळाला शुद्ध मराठी भाषेत चेंडूफळी किंवा 'लंब दंड गोल पिंड धर पकड प्रतियोगिता' असेही म्हटले जाते.


तर मित्रहो ही होती क्रिकेट खेळाची माहिती व Cricket information in marathi. या लेखात देण्यात आलेली cricket chi mahiti मोठ्या प्रमाणात रिसर्च करून लिहिण्यात आलेली आहे. म्हणून आशा करतो आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. या information about cricket in marathi माहितीला इतरांसोबतही शेअर करा. जेणेकरून सर्वांना याविषयी चे नॉलेज मिळेल. धन्यवाद..


  • अधिक वाचा 

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने