माझा आवडता कलावंत/कलाकार मराठी निबंध | Maza avadta kalavant marathi nibandh

Maza avadta kalavant / kalakar : आजच्या या लेखात आपण माझे आवडते कलावंत अथवा कलाकार हा निबंध पाहणार आहोत. 

मित्रांनो कलावंत हा असा व्यक्ति असतो जो कोणत्यातरी गोष्टीत प्रवीण असतो. व आपल्या या कलेच्या सहाय्याने तो समाजात परिवर्तन घडून आणतो. maza avadta kalavant हा मराठी निबंध आपण शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. तर चला सुरू करूया 


Majha avadta kalavant

माझा आवडता कलावंत - Maza avadta kalavant marathi nibandh

प्रत्येक व्यक्तीची आवड आणि छंद वेगवेगळा असतो. वाचन, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, कविता, लेखन  इत्यादी विविध कला व छंद प्रत्येकाच्या अंगी असतात. या कलेचा उपयोग करून काही लोग जगासमोर आदर्श निर्माण करतात. आपल्या देशात अनेक महान कलावंत होऊन गेले आहेत. परंतु मला भावणारे व माझे आवडते कलावंत मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी व लेखक विष्णु वामन शिरवाडकर आहेत. शिरवाडकर यांना आपल्या प्रभावी साहित्य लेखनामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपले लेखन कुसुमाग्रज या टोपनावाने केले. 


कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या संस्कृती मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी, लेखक व समीक्षक होते. मराठी भाषेतील त्यांच्या योगदानामुळे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ व कुसुम नावाची एक लहान बहीण होती. कुसुम ही त्यांची खूप लाडकी होती. व कुसुमच्या नावावरून कुसुम चे अग्रज (मोठे) असल्याने त्यांनी कुसुमाग्रज नाव धारण केले. 


कुसुमाग्रजांनी नाशिक मधून बीए ची पदवी मिळवली. त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या व चित्रपटात भूमिका देखील साकारल्या. स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी या वृत्तपत्रांचे संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केले. आपल्या लेखणी तून त्यांनी सामाजिक अन्याय, विषमता, सांस्कृतिक कार्यक्रम, गरीब व दलितांना सहाय्य इत्यादी गोष्टींवर लेखन केले. 1942 च्या स्वातंत्र्य लढ्याची चळवळ सुरू असताना ते प्रभात दैनिकात काम करत असत. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा जयजयकार..' ही देशाला स्फूर्ती देणारी कविता लिहिली. त्यांची ही कविता वाचून इंग्रज पोलिसांनी त्यांच्या कार्यालयात धाड टाकली. कार्यालयात काम करणाऱ्या लोकांची नावे पहिली तर त्यात कुसुमाग्रज नाव सापडलेच नाही. कारण रजिस्टर मध्ये कुसुमाग्रजांचे नाव वि वा शिरवाडकर लिहीले होते. 


कुसुमाग्रज बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे व्यक्ति होते त्यांनी लेखनासोबतच, देशाचे स्वतंत्र व समाज कल्याणाची कार्यही केली. आपल्या जीवन काळात त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपला पहिला कवितासंग्रह 'जीवनलहरी' प्रकाशित केला. त्यांच्या 'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला' या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या शिवाय अक्षरबाग, किनारा, मराठी माती, प्रवासी पक्षी, श्रावण, जीवन लहरी इ. त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. 


आपले संपूर्ण जीवन लेखन, देश आणि समाजासाठी घालवणाऱ्या या महान कलावतांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी 87 वर्षाच्या वयात नाशिक मधील त्यांच्या घरी झाला. मृत्यू नंतरही वि वा शिरवाडकर यांची 'कुसुमाग्रज प्रतिष्ठान' नावाची एक संस्था विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरिब व दलित लोकांना मदत करणे इत्यादि कार्य करीत आहे.  

कुसुमाग्रज यांची मराठी माहिती वाचा येथे 

***


तर मित्रांनो हा होता कुसुमाग्रज यांच्यावर लिहिलेला Maza avadta kalavant marathi nibandh आशा करतो की तुम्हाला हा निबंध आवडला असेल. हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद.


माझा आवडता अभिनेता मराठी निबंध वाचा येथे  

Mohit patil

मित्रहो, माझे नाव मोहित पाटील. वाचनाची आवड असण्यासोबतच मला लिहायलाही आवडते. मला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग म्हणून मी Bhashan Marathi हा ब्लॉग लिहणे सुरू केले आहे. या ब्लॉग वरील मराठी निबंध व माहिती तुम्हास कशी वाटते मला कमेन्ट करून नक्की सांगत जा. आपण आपले अभिप्राय पुढील instagram अकाऊंट द्वारे पाठवू शकतात: ReadMore instagram youtube

5 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने